2024-07-29T05:21:45
अनभिज्ञता आणि संबंध ठेवण्याबाबत असलेली भीती या प्रमुख कारणांमुळे संबंध टाळले जातात. समर्डिंग आकर्षण, आजारांमुळे कमी झालेली शारीरिक क्षमता, पूर्वीच्या काही वाईट अनुभवांमुळे मनात असलेली भीती, संबंध कसे ठेवायचे याबाबत नसलेली माहिती. पॉर्नोग्राफीचे अति आकर्षण अशा कारणांमुळे देखील संबंध टाळले जातात. याबाबत लग्नाआधीच मोकळेपणाने चर्चा होत नसल्याने किंवा योग्य समुपदेशन न घेतल्याने लग्नानंतर वाद होण्यास सुरुवात होते. त्यामुळे नेमके कारण समजून घेत त्यावर उपाय गरजेचा आहे. - डॉ. सागर पाठक, स्त्रीरोगतज्ज्ञ, कौटुंबिक आणि लैंगिक समस्या सल्लागार